जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल आणि प्रदूषणाबाबत तातडीने अहवाल द्या! 

जयगड येथील जिंदाल कंपनीच्या प्रदूषणाबाबत आणि बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे गॅस टर्मिनल उभारण्याकरिता खोटे प्रमाणपत्र प्राप्त केल्याचा आरोप माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी प्रदूषणाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्या असून, गॅस टर्मिनलबाबतच्या प्रमाणपत्राचा अहवाल महाराष्ट्र सागरी मंडळाकडे मागितला आहे. जिंदाल कंपनीतून बाहेर पडणारी राख आंब्याच्या झाडावर बसून आंबा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी निवेदनाद्वारे केला आहे.