
बिष्णोई टोळीच्या नावाने व्यावसायिकाकडून खंडणी मागणाऱ्या तेजस शेलारला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. त्याला ऑनलाइन गेमिंगचा नाद होता. त्याच्यावर तीन लाख रुपयांचे कर्ज होते. ते कर्ज फेडण्यासाठी त्याने धमकीचा पह्न केल्याचे तपासात समोर आले आहे.
तक्रारदार हे व्यावसायिक असून ते जेव्हीपीडी स्कीम परिसरात राहतात. मंगळवारी त्यांना पह्न आला आणि समोरील व्यक्तीने बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगत तुमची 25 लाख आणि एक किलो सोने अशी हत्येची सुपारी मिळाल्याचे सांगितले. जर पैसे दिले नाही तर वाईट परिणामाला सामोरे जायला तयार रहा असे धमकावले. त्यानंतर व्यावसायिकाने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत खरात, निरीक्षक अब्दुल रौफ शेख, सहाय्यक निरीक्षक सुविधा पुलल्लेपू, सानप, उपनिरीक्षक शिवाजी सावले, काळे आदींच्या पथकाने तपास करून तेजस शेलारला अंबरनाथ येथे पकडले.