
हिंदुस्थानची नक्कल करत पाकिस्तानने त्यांच्या खासदारांचे शिष्टमंडळ पाठवले विविध देशांच्या दौऱ्यावर पाठवले आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ अमेरिकेला गेले असता अमेरिकन खासदार ब्रॅड शेरमन यांनी पाकिस्तानने दहशतवादी संघटनांचा नायनाट केला पाहिजे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचाही खात्मा करणे गरजेचे आहे असे ठणकावत पाकिस्तानला चांगलाच दणका दिला.
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरात पाठवले. याची नक्कल करत पाकिस्ताननेही आपल्या खासदारांचे शिष्टमंडळ पाठवले आहे, मात्र भुट्टो यांच्या नेतृत्वातील पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ अमेरिकेला गेले असता त्यांना टीकेचा सामना करावा लागला.
पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येस जबाबदार
जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येसाठी जबाबदार आहे, असे खासदार ब्रॅड शेरमन यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबतही चिंता व्यक्त केली.