पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि त्याचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीत समावेश करावा, या मागणीसाठी आता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक 15 ऑगस्टपासून पुन्हा उपोषण करणार आहेत. लडाखच्या प्रश्नांवर सोनम वांगचुक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लडाखमधील लोकशाहीची स्थिती कमकुवत झाली असल्याचे सांगितले.
बाल्टिस्तान, पाकव्याप्त कश्मीरमध्ये स्थानिक गर्व्हनर निवडले जातात, ते चांगले काम करत आहेत. मात्र लडाखमध्ये लोकशाही कमी असून आमच्यापेक्षा तर पाकिस्तान चांगला, असे म्हणतानाच सीमेवर राहणाऱया लोकांचा श्वास गुदमरला, तर नुकसान होईल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. त्यांची ही मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.