साथीचे आजार रोखण्यात प्रशासनास अपयश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। राहुरी

राहुरीत साथीचे आजार रोखण्यात नगर परिषद अपयशी ठरली आहे. यामुळे या विभागात डास निर्मुलन फवारणीबरोबरच प्रभाग स्वच्छतेचे काम करण्यासाठी सातपीर बाबा गणेश मंडळ पुढे सरसावले आहे.

या प्रभागाचे नगरसेवक अक्षय तनपुरे यांनी गणेशोत्सवात देखाव्यावर होणारा खर्च टाळून प्रभागाच्या स्वच्छतेवर भर दिला आहे.याकामी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा देखील मोठा हातभार लागला आहे. महिन्याभरा पुर्वी याच प्रभागातील बिरोबानगर परिसरात मलेरिया,डेंगू, गोचीड तापाची लागण झालेले रूग्ण आढळल्याने राहुरी शहरात खळबळ उडाली होती.

गेल्या महिन्यापासुन संपुर्ण शहरात डेंगू व मलेरिया या जीवघेण्या आजाराने डोके वर काढल्याने नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची कार्यपद्धती वादग्रस्त ठरली होती. या आजाराचा वाढता फैलाव रोखण्यासाठी नगर परिषदेकडुन या भागात डास निर्मुलन औषध फवारणी करण्यात आली.माञ औषधांचा काहीच परिणाम झाला नाही. यामुळे गुरूवारी सकाळी माजी उपनगराध्यक्ष आर.आर.तनपुरे,नगरसेवक अक्षय तनपुरे,ऋषी तनपुरे व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी झाडूने सर्व परिसर स्वच्छ केला.