
सामना ऑनलाईन । मुंबई
मंत्रालय परिसरात मेट्रोच्या कामांमुळे अनेक ठिकाणी पाणी साचून डेंग्यू-मलेरिया पसरत आहे. गेल्या काही दिवसांत डेंग्यू-मलेरियाचे तब्बल 12 रुग्ण आढळले आहेत. याची दखल घेत पालिकेच्या ‘ए’ विभागाकडून ‘एमएमआरडीए’ला पत्र लिहून पाणी साचू देऊ नका, असे कळवले आहे. येत्या काही दिवसांनंतर पावसाळी अधिवेशन आहे. त्यामुळे या परिसरात गर्दी आणखी वाढणार आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय पावसाळाही अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे पाणी साचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने ‘एमएमआरडीए’ला पत्र लिहून पाणी साचू देऊ नका, अशा सूचना केल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

























































