अजिंक्य, श्रेयस, दिनेशकडे नेतृत्व, देवधर ट्रॉफीसाठी तिन्ही संघांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नवी दिल्लीत 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या देवधर ट्रॉफीसाठी हिंदुस्थान ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या संघांची घोषणा अखिल हिंदुस्थानी सीनियर निवड समितीकडून गुरुवारी करण्यात आली. यावेळी दिनेश कार्तिककडे ‘अ’ संघाचे श्रेयस अय्यरकडे ‘ब’ संघाचे आणि अजिंक्य रहाणेकडे ‘क’ संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. रविचंद्रन अश्विनलाही या संघात स्थान देण्यात आले आहे.  

हिंदुस्थान ‘अ’ : दिनेश कार्तिक (कर्णधार, यष्टिरक्षक), पृथ्वी शॉ, अनमोलप्रीत सिंग, ए. आर. ईस्वरन, अंकित बावणे, नितीश राणा, करुण नायर, कृणाल पांडय़ा, रविचंद्रन अश्विन, श्रेयस गोपाल, एस. मुलानी, मोहम्मद सिराज, धवल कुलकर्णी, सिद्धार्थ कौल.  

हिंदुस्थान ‘ब’ : श्रेयस अय्यर (कर्णधार), मयांक अग्रवाल, रितूराज गायकवाड, पी. एस. चोप्रा, हनुमा विहारी, मनोज तिवारी, अंकुश बैन्स (यष्टिरक्षक), रोहित रायुडू, के. गौतम, मयांक मार्कंडे, एस. नदीम, दीपक चाहर, वरुण ऍरोन, जयदेव उनाडकट.

हिंदुस्थान ‘क’ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), अभिनव मुकुंद, शुबमन गिल, आर. समर्थ, सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टिरक्षक), विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, पप्पू रॉय, नवदीप सैनी, आर. गुरबानी, उमर नझीर.