डिप्रेशन विरोधात दीपिकाची व्याख्यान मालिका

414

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यशाच्या शिखरावर पोहोचूनही मानसिक आजाराने त्रस्त होती. दीपिकाने मोठ्या प्रयत्नाने या आजारावर विजय मिळवला आहे. आजही आपल्या देशात मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. समाजाकडून अशा व्यक्तींना बहिष्कृत केले जाते. त्यामुळे मानसिक आजाराने ग्रस्त रुग्ण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. अशा व्यक्तींना बोलते करण्यासाठी सामान्यांमध्ये मानसिक आजारांबाबत जनजागृती पोहोचाकी या हेतूने दीपिकाने व्याख्यानमाला सुरू केली आहे. रविवारी नवी दिल्लीत दीपिकाने या चर्चासत्र मालिकेस प्रारंभ केला.

याकेळी दीपिका म्हणाली, ‘हे चर्चासत्र सुरू करण्याचा प्रमुख उद्देश, मानसिक आजारांबाबत समाजात पसरलेले गैरसमज बदलण्याचा आहे. या व्याख्यानमालेच्या मदतीने तज्ञांकडून अनेक नवनवीन गोष्टी शिकू शकतो. या चर्चासत्राला तज्ञ डॉक्टर्स संबोधित करणार आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या