कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलेले नाही…; अजित पवारांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं

महायुती सरकारने सत्तेत येण्यासाठी सामान्य जनतेला अनेक आश्वासने दिली. त्यातील महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी यावर त्यांनी भर दिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी अशी भंपक आश्वासनं देणाऱ्या सरकारने आता उघडपणे पलटी मारली आहे. विरोधकांकडून सतत होणाऱ्या प्रश्नांच्या भडीमारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णविराम दिला.

शेतकरी कर्जमाफीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना काढता पाय घेतला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन तुम्हाला कोणी दिलं? मी दिलं आहे का? मी तरी दिलेलं नाहीए, असं म्हणत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यांनी माहिती दिली. लाडकी बहीण योजनेचं आम्ही नियोजन केलं आहे. आदिती तटकरे यांनी सांगितल्यानंतर तातडीने नियोजन केलं असून सगळ्या योजनांचे पैसे देण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते यावेळी म्हणाले.

 

ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात तेसुद्धा अतिरेकीच!

 

शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी मिळणार नाही! अजित पवार यांनी पलटी मारली