
महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आता तत्काळ दाद मागणे शक्य होणार आहे. यासाठी राज्य महिला आयोगाकडून विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे. यामुळे घरबसल्या कुठूनही एका क्लिकवर तक्रार नोंदविता येणार आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ‘महिला सन्मान पोर्टल’चे उद्घाटन करण्यात आले. महिलांवरील अन्याय अत्याचार कमी व्हावेत, अत्याचारांविरोधात आवाज उठवता यावा याकरता या पोटलच्या माध्यमातून एक ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
n या पोर्टलमुळे महाराष्ट्रातील महिलांना, मुलींना त्यांच्यावर अत्याचार किंवा सायबर गुन्हे झाले तर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता. हे पोर्टल संबंध पोलीस यंत्रणेशी जोडलं गेलं आहे. त्यांची तक्रार लगेच नोंदवली जाईल. त्यातून तत्काळ न्याय मिळण्याची व्यवस्था यात आहे. ज्या मुली, महिला तक्रार करायला घाबरतात त्यांना याचा फायदा होणार आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.






























































