आज 1 एप्रिल तर नाही, तृणमूल नेत्याचा पंतप्रधानांना टोला

भाजप प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकासाठी काम करतेय, असे ट्विट करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते डेरेक ओ’ब्रायन यांनी बुधवारी ट्विटरवर ‘आज 1 एप्रिल तर नाही’ असा टोला लगावला. ओब्रायन यांनी आपल्या ट्विटला पंतप्रधान कार्यालयालाही टॅग केले आहे.

1 एप्रिल रोजी ‘एप्रिल फूल’ म्हणत फसवले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी केलेल्या ट्विटमध्ये ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास… भाजपचे मोदी सरकार प्रत्येक हिंदुस्थानीसाठी काम करत आहे. हाच हिंदुस्थानचा स्वभाव आहे. सर्व हिंदुस्थानींनी स्वस्थ आणि प्रसन्न राहावे. त्याच दिशेने भाजपही प्रत्येक हिंदुस्थानीच्या कल्याणासाठी काम करत आहे’ असे म्हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या