श्रीगणेशा देवा श्रीगणेशा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील ‘श्रीगणेशा देवा श्रीगणेशा…’ हे आल्हाददायी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्याला ओंकार घाडी यांचे शब्द लाभले असून काशी रिचर्ड यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. ढोल ताशांचा गजर … गुलालाची उधळण.. बाप्पाचा जयघोष… असे गणेशोत्सवातील भारावून जाणारे वातावरण या गाण्यात पाहायला मिळत आहे. गाण्याची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली आहे..

नव्या सुरेल भेटीबद्दल आदर्श शिंदे म्हणाले, मुळात बाप्पाचे गाणं गायला मला नेहमीच आवडते. भक्तिमय गाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. श्रीगणेशा देवा श्रीगणेशा… हे गाणेही असेच स्फूर्तिदायी गाणे आहे. हे गाणे भाविकांनाही आवडेल, अशी मी आशा व्यक्त करतो.