देवली उपसरपंचांसह 4 सदस्य शिवसेनेत दाखल

1043

मालवण तालुक्यातील देवली ग्रामपंचायत उपसरपंच भाऊ चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष बबली चव्हाण, माजी सरपंच विजय चव्हाण, शिवदास चव्हाण यांच्या समवेत कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या कन्या रुची राऊत, जिप गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे व तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वांनी प्रवेश केला.

यावेळी बोलताना भाऊ चव्हाण यांनी स्वाभिमान पक्षाच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचला. शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या अनेक विकास कामांचा उल्लेख केला. ज्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत होत असलेले सुमारे अडीज कोटी व पावणे दोन कोटी रुपये खर्च होत असलेले २ महत्वाचे रस्ते,भगवती मंदिर रास्ता, भगवती मंदिर सुशोभीकरण, स्मशानभूमी, ग्रामपंचायत विस्तारीकरण, संरक्षक भिंती, मालवण देवली रास्ता इत्यादी कामे ही शिवसेनेच्या माध्यमातून गावामध्ये होत आहेत. जनतेमध्ये नाईक साहेब नव्हे तर आमचा वैभव,आमचा हरी ही आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत वैभवजी नाईक मोठया मताधिक्याने निवडून येऊन मंत्री होऊन देवली गावात येतील असा विश्वास व्यक्त केला.

आमदार वैभव नाईक यांनी सर्व प्रवेशकर्त्याना पक्षामध्ये प्रवेश देऊन त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले. यावेळी नागेंद्र परब, हरी खोबरेकर व बबन शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, शाखाप्रमुख सुरेश नाईक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या