शरद पवार यांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग – फडणवीस

1212

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दै. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीची राजकीय वर्तुळातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ही मुलाखत म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूएफ किंवा नुरा कुस्ती आहे़ मॅच फिक्सिंग आहे, अशी टीका केली आहे.

पत्रकारांनी आज फडणवीस यांना शरद पवार यांच्या दै. सामनामधील मुलाखतीबाबत विचारले असता ते म्हणाले, मॅच फिक्सिंग एकदा संपू द्या. योग्य वेळी मी त्यावर प्रतिक्रिया निश्चित देईन. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी संकटात राजकारण केले जातेय, सरकार पाडायचा प्रयत्न होतोय. ही ती वेळ नाही, असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, स्वतःच मारून घ्यायचं आणि स्वतःच रडायचं ही एक नवीन पद्धत आहे. ती पद्धत जर अवलंबली तर आपल्या अपयशापासून लोकांची नजर बाजूला होते. त्यातलाच हा प्रकार आहे. कोणीही सरकार पाडत नाहीये. आपणच कांगावा करायचा, त्याच्यावर मुलाखती करायच्या, त्याच्यावरच बोलायचं, जेणेकरून करोनाचे प्रश्न दूर होतील, असा हा प्रयत्न आहे. मला वाटतं त्यांनी करोनाकडे लक्ष द्यायला हवं.

आपली प्रतिक्रिया द्या