
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात भाजपमधील अंतर्गत वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. उमेदवारी देण्यात पक्षाकडून योग्य भूमिका घेण्यात आली नाही, असा आरोप करत भाजपमधील 80 हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. राजीनामा दिलेल्या 80 कार्यकर्त्यांपैकी 45 पदाधिकार्यांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक 16 (ड) चे माजी अध्यक्ष गजानन निशीतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 80 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. 2017 मध्ये आपल्याला उमेदवारी मिळाली नव्हती आणि या वर्षीही आपल्याला पक्षाने पुन्हा एकदा डावलले आहे. या वेळी जागा ओपन असतानासुद्धा आपल्याला उमेदवारी देण्यात आली नाही. प्रभागातील सर्वाधिक 24 मतदान बूथ आपल्याकडे आहेत. निवडणुकीसाठी मला कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितले होते, परंतु स्थानिक नसलेल्या महिला उमेदवाराला ऐनवेळी पक्षाने तिकीट देऊन माझ्यावर अन्याय केला आहे, असे निशीतकर म्हणाले.






























































