नाशिकमधील महावितरण कामांतील गैरप्रकारांची चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक येथे महावितरणच्या कामांमध्ये तसेच खासगी कंत्राटदारांच्या संदर्भात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींची दखल घेण्यात आली असून याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. नाशिक येथील द्वारका उपविभागीय कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नारायण सोनावणे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मुलाच्या माधवगिरी इलेक्ट्रिकल्स कंपनीला नियमबाह्य पद्धतीने महावितरणचे कंत्राट दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती.