विधानपरिषदेतील ‘धस’मुसळेपणावर मुख्यमंत्र्यांनी कान टोचले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपुर

गेल्या दोनतीन दिवसांपासून विधानपरिषदेत सुरू असलेल्या ‘धस’मुसळेपणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधकांना संयमाने वागण्याचा सल्ला देत. वैयक्तिक भांडणे उकरून काढण्याचे हे सदन नाही, अशा शब्दात कान टोचले. गुरूवारी विधानपरिषदेत सुरेश धस यांनी बीड जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित करून आणि धनंजय मुंडे, अमरसिंह पंडीत यांच्यावर आरोप केले. यावरून धस-मुंडे यांच्यात प्रचंड वाद झाले. यात सभागृहाचे कामकाज होऊ शकले नव्हते.

शुक्रवारी सकाळी हा मुद्दा उपस्थित करून सुनिल तटकरे यांनी विधानपरिषदेतील वातावरण गढूळ झाल आहे. सभागृहात कटूता आली आहे, यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती यांनी केली. शरण रणपिसे यांनीही सभागृहाची गरीमा कमी होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सभागृहात वैयक्तीक टीका, असंसदीय भाषेचा वापर होणे योग्य नाही. अमरसिंह पंडीत, सुरेश धस यांना सभागृहाची प्रतिष्ठा पाळण्याची सूचना यापुर्वी दिली होती. सत्ताधारी आमदारांसह विरोधकांनी एकमेकांवर वैद्यकीय टीका करताना संयम बाळगून चांगले शब्द वापरा. दोन दिवसात जे काही घडले त्यातील आक्षेपार्य काही आहे का हे, तपासून कामकाजातून काढून टाकण्याची सभापतींना विनंती केली.