
माझ्यात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोणताही वाद नाही, पण मतभेद आहेत. दोघांमध्ये काही गोष्टींवर एकमत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले.
आपल्या घरातही दोन भावांची मते काहीअंशी वेगवेगळी असतात. ती मते एक नसतात. तसेच काही गोष्टींवर आमचे एकमत होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सगळय़ा गोष्टींवर आमचे एकमत असते तर आम्ही वेगवेगळय़ा पक्षांत का राहिलो असतो? आम्ही एकच पक्ष असतो. पण आम्ही वेगवेगळे पक्ष आहोत. आमच्यात मतमतांतरे आहेत, असे फडणवीस म्हणाले.



























































