‘चौक’ येतोय दणक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’! या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. टीझरची सुरुवातच भव्य गर्दीने होते. चौकाचं आणि गणेशोत्सवाचं एक वेगळंच समीकरण असतं. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी मैत्री, वाद, चर्चा हे सगळे चौकातले अविभाज्य विषय असतात. सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या ‘चौक’ चित्रपटाची निर्मितीमूल्य या सगळ्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून दिसून येतात. याशिवाय ट्रेलरमध्ये प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळेसारखे अनेक प्रसिद्ध चेहरे दिसत आहेत. यामुळे मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मल्टिस्टारर चित्रपटाचा आनंद मिळणार हे नक्की! अभिनेता व दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांनी लेखन, संवाद, कथा, पटकथा या सर्वच पातळ्यांवर बाजी मारली आहे.