किंजवडे-परबवाडी येथे ३० फुट खोल दरीत कोसळलेली देवगड-डोबवाडी एसटी बस़

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवगड

देवगड आगारातुन सायंकाळी ५ वाजता सुटणारी देवगड-डोबवाडी प्रवाशी फेरी परतीच्या प्रवासाकरीता निघाली असता किंजवडे-परबवाडी येथील ओहोळात ३० फुट खोल दरीत कोसळून एसटीचा अपघात झाला. यात एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. या प्रवाशी फेरीवर चालक बापु काळे, वाहक के. एल. कदम सेवा बजावत होते. अपघाताची वृत्त समजताच किंजवडे-परबवाडी येथील ग्रामस्थांनी धाव घेवुन एसटी प्रवासी व वाहक चालकाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

मिळालेल्या माहीतीनुसार, देवगड आगारातुन सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास देवगड-डोबवाडी ही एसटी फेरी सुटते. डोबवाडीतुन पुन्हा देवगडच्या दिशेने येत असताना किंजवडे-परबवाडी येथे वहाळात चालकाचा ताबा गाडी ३० फुट वहाळात कलंडली. यावेळी देवगडच्या दिशेने येत असताना जामसंडे येथील दोन प्रवाशी प्रवास करीत होते. यामध्ये संगमी जाधव (६०, जामसंडे), प्रकाश जाधव (३६, जामसंडे) प्रवास करत होते. यांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहीती मिळताच किंजवडे-परबवाडी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवुन आतील प्रवाशी व वाहकांना बाहेर काढण्यास शर्थीचे प्रयत्न केले. सदरची माहीती किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर यांनी देवगड आगार व्यवस्थापकांना दिल्यानंतर आगार व्यवस्थापक डी. एम. चव्हाण यांनी आपल्या सहकाºयांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. अद्यापही या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली नाही.