त्या बॅनरची चर्चा तर होणारच! आम्ही निवडून दिलेल्या नेत्यांनी फक्त आपलाच विकास केला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड आनंदवाडीकडे जाणाऱया मार्गावर नगर पंचायतीच्या मार्गदर्शक फलकावर कोणीतरी लोकप्रतिनिधींच्या विरोधात रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी लावलेल्या फलकावरून शहरात एकच चर्चा रंगली होती. चर्चा वाऱयासारखी पसरताच काही वेळातच हा फलक काढण्यात आला. मात्र या फलकाची दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती.

देवगड शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे नगर पंचायतीच्या नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याने एका संतप्त नागरिकाने देवगड आनंदवाडीकडे जाणाऱया मार्गावर जाहीर नोटिसीचा फलक लावला. हा फलक शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. या फलकावर ‘आम्ही निवडून दिलेल्या नेत्यांनी फक्त आपलाच विकास केला, पण रस्त्याचा विकास करणे जमले नाही. त्यामुळे आपली वाहने सावकाश चालवा. आपला एक वैतागलेला सामान्य माणूस’ असे लिहिले होते.