देवगड- सरपंच पदासाठी आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन

देवगड तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहित पद्धतीने निश्चित करण्यासाठी सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम 28 जानेवारी सकाळी 11 वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे येथे करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच ग्रा.प.सदस्य, जि.प. सदस्य, प.स.सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी प्रवर्ग निहाय,सरपंच पद आरक्षण निश्चितीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार मारुती कांबळे यांनी केले आहे.

ग्रामपंचायतीच्या सन 2020 ते 2025 च्या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन शासन ग्रामविकास विभाग यांचे पत्राने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सरपंच आरक्षण निश्चित केल्याने मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964च्या नुसार पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी निश्चित करण्यात आलेले असून जिल्ह्यातील आरक्षण कोटा निश्चित करण्यात आलेला आहे.

त्यानुसार देवगड तालुक्याची एकूण लोकसंख्या 104952 असून 72 ग्रामपंचायती आहेत. यात अनुसूचित जाती लोकसंख्या 6106, अनुसूचित जमाती लोकसंख्या 793,आहे. अनुसूचित जातीकरिताआरक्षित सरपंच पद प्रवर्ग 2, महिला 2 पदे आहेत. अनुसूचित जमाती आरक्षित सरपंच पद, प्रवर्ग- 0, महिला- 1, या प्रमाणे आहे.

नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंच पदे प्रवर्ग- 9 महिला- 10, तर खुला प्रवर्ग प्रवर्ग 24 महिला 24 या प्रमाणे सरपंच पदाची आरक्षित पदे निश्चित केली आहेत.

सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमाला उपस्थित रहाणाऱ्या सर्व व्यक्तींनी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याकरिता मास्क वापर, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. तसेच विनाकारण गर्दी होणार नाही. याची दक्षता ही नागरिकांनी घ्यावी असे आवाहनही तहसीलदार देवगड यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या