
देवगड आगारातील चालक व वाहक यांनी सेवा बजावत असताना प्रवासात सापडलेले रोख रक्कम व महत्त्वाचे कागदपत्रे असलेले पाकिट सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्याकडे जमा ग जमा करून आपला प्रामाणिकपणा दाखविला आहे.
अधिक माहिती अशी की दुपारी 12 वाजता सुटणारी देवगड खुडी मार्गे कणकवली या प्रवासी फेरीवर चालक डी .आर. साटम आणि वाहक एस.एस.फोडके हे सेवा बजावत असताना त्यांना रोख रक्कम, आधार कार्ड, एटीएम पॅन कार्ड असलेले पाकीट सापडले. सदरहू पाकीट त्यांनी सहाय्यक वाहतूक निरीक्षक एल.एम.सरोदे यांचे कडे जमा केले. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न एसटी प्रशासनाकडून सुरू असून दशरथ राऊत मुंबई यांचे पाकीट असल्याचे समजते. चालक वाहक यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे प्रवासी वर्गातून कौतुक होत आहे.























































