नाशिक – देवळा-सौंदाणे रस्त्यावर भीषण अपघात; अ‍ॅपेरिक्षा, बस विहिरीत कोसळून 25 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवळा-सौंदाणे रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता एसटी बस आणि अ‍ॅपेरिक्षाची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. यात अ‍ॅपेरिक्षा आणि बस दोन्हीही सुमारे 70 फूट खोल विहिरीत कोसळली. या अपघातामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला असून 30 प्रवासी जखमी आहेत.

कळवण डेपोची एसटी बस धुळ्याहून कळवणकडे निघाली होती. देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्यालगत दुपारी पावणेचार वाजता देवळ्याहून मालेगावकडे जाणाऱ्या अ‍ॅपेरिक्षाला तिची धडक बसली. बसमध्ये 35, तर अ‍ॅपेरिक्षात 7 प्रवासी होते. अपघातानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत दोन्हीही वाहने कोसळली आहेत. या भीषण दुर्घटनेमध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला.

nashik-acci

अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरू केले. नागरिकांचीही येथे मोठी गर्दी उसळली. पोलिसांनी आणि प्रशासनाने जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान काही प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. जखमींची संख्याही मोठी असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.