धनंजय मुंडें सीमोल्लंघन येथे… करणार !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । बीड

दसरा जसं जसा जवळ येतोय तसे राज्याचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचे सीमोल्लंघन कोठे असणार असा प्रश्न समर्थकांना पडला आहे. यंदा धनंजय मुंडे दर्शन आणि सीमोल्लंघनासाठी ते माहूर गडावर जाणार आहेत.

दसरा जवळ येतोय बीड जिल्ह्यातील सर्वच शक्ती आणी भक्ती स्थळावर दसऱ्या ची तयारी सुरू झाली आहे मग भगवान गड असो की नारायण गड किंवा भगवान बाबाचे जन्मगाव सावरगाव घाट भक्तांनी फुलून जाणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सीमोल्लंघनासाठी कोठे जाणार असा प्रश्न त्याच्या समर्थकांना पडला असेल, धनंजय मुंडे यंदा माहूर गडावर रेणुका मातेच्या दर्शनाला जाणार आहेत, माहूर ची रेणुका माता हे धनंजय मुंडे यांचे कुलदैवत आहे सहकुटूंब ते माहुर गडावर असणार आहेत.