धारणगाव ग्रामपंचायत बिनविरोध; ग्रामस्थांनी सामंजस्याने केली निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत तालुक्यातील मौजे धारणगाव येथील ग्रामस्थांनी एकोप्याने सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड केली आहे. त्याबद्दल आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन करून गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व योजना कार्यान्वित करण्याची ग्वाही दिली आहे.

बिनविरोध निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सोमवारी आमदार संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब रामराव डुकरे, किरण जनार्धन डुकरे, गुलाबराव दशराथ डुकरे, सौमित्रा कुंडलीकराव डुकरे, शोभा रामराव वायभासे, दत्ता त्रिंबकराव वायभासे, रमेश रामजी साळवे यांचा आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.