
कोरोना संसर्गामुळे दिल्लीत भयावह स्थिती निर्माण झाली होती. त्याचवेळी मुंबईतील धारावीत परिस्थिती आटोक्यात येत होती. यातून बऱ्याच गोष्ट शिकता आल्या. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी धारावीत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेऊन `दिल्ली मॉडेल’ तयार करण्यात आले. महिनाभरात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
आनंदवार्ता; रशियाची लस 10 ऑगस्टपर्यंत येणार
कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुंबईतील धारावीत करण्यात आलेल्या कामाचे कामाचे जगभरातून कौतुक होत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही याचे कौतुक केले आहे. दिल्लीला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’ची खूपच मदत झाल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
लढाई जिंकण्यासाठी झोकून देऊन काम करा! पुणे लवकरच कोरोनामुक्त होईल – मुख्यमंत्री
प्लाझ्मा उपचारामुळे रुग्ण बरे होत असल्याने प्लाझ्मा थेरपी करण्यास परवानगी द्यावी म्हणून केंद्र सरकारकडे विनंती केली. एलएनजेपी रुग्णालयातील डॉक्टरांनी यासाठी खूप परिश्रम घेतले. रुग्णही बरे व्हायला लागले. आता प्लाझ्माची मागणी वाढताना दिसत असल्याचे केजरीवाल म्हणाले. सिरो सर्वेक्षणाला आपण सामूहिक रोगप्रतिकार शक्ती वाढण्याच्या अनुषंगाने पाहावे. दिल्लीतील सर्वेक्षणात 24 टक्के लोकांमध्ये कोरोनाशी लढणारी रोगप्रतिकारशक्ती दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
हरायचे नाही, तर जिंकायचे हेच सूत्र!
कोरोनासोबत एकट्याने लढून चालणार नव्हते. आम्ही केंद्र सरकार, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, खासगी रुग्णालये, हॉटेल आदींची मदत घेतली. ‘हरायचे नाही, तर जिंकायचे’ हेच सूत्र ठरवूनच आम्ही 24 तास काम करीत आहोत. जून महिन्यात दिल्लीतील स्थिती खूप वाईट होती. लॉकडाऊन संपले तेव्हा मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली. तज्ज्ञांच्या मदतीने नियोजन केले. आता परिस्थिती आटोक्यात आली असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.






















































