धारावीत बेरोजगार तरुणांचा आक्रोश, खासगीकरणाविरोधात लोकसत्ताक संघटनेची आज निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिपाई, शिक्षक, लिपिक, विधी अधिकारी अभियंता आदी 136 प्रकारची पदे बाह्य एजन्सीजमार्फत भरण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय लोककल्याणाच्या धोरणाला काळिमा फासणारा असून भांडवलदारांच्या तिजोऱया भरणारा आहे. सरकारच्या या सरसकट खासगीकरण, कंत्राटीकरण करण्याच्या निर्णयामुळे विविध प्रवर्गाचे आरक्षण संपुष्टात येणार आहे. त्यामुळे सरकारच्या या धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय लोकसत्ताक संघटना आणि भारतीय लोकसत्ताक बेरोजगार महासंघाच्या वतीने उद्या, 8 एप्रिल रोजी धारावी येथील धोबीघाट पोलीस चौकी बीट क्रमांक 1 येथे निदर्शने करण्यात येणार आहे.

या आंदोलनात भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष अमोलकुमार बोधिराज, उपाध्यक्षा दीपिका आंग्रे, भारतीय बेरोजगार संघाचे अध्यक्ष विशाल गायकवाड, सरचिटणीस किरण गमरे, सचिव वैशाली मोहिते तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते मकरंद तासगावकर, अंकिता मोरे, कमलेश मोहिते, मयूरेश जंगम, पिलाजी कांबळे, ऍड. रूपाली खळे, मनीष जाधव, सनी कांबळे, मंगेश खरात, वैभव मोहिते, योगेश कांबळे, अमित खैरे, स्वप्नील खळे, प्रतीक कदम, पूनम पवार सहभागी होणार आहेत.

प्रमुख मागण्या
n शासनाने बाह्य एजन्सीजद्वारा शिपाई, शिक्षक, लिपिक, विधी अधिकारी अभियंता इत्यादी 136 प्रकारची पदे बाह्य एजन्सीजमार्फत भरण्याचा, खासगीकरणाचा, कंत्राटीकरणाचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा.
n एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सुरू करून सर्व भरती प्रक्रिया एम्प्लॉयमेंट एक्सचेंजद्वारेच करण्यात यावी.
n शासकीय, निमशासकीय व महामंडळे इत्यादी आस्थापनांतील भरती ही विविध प्रवर्गाच्या आरक्षणानुसार शासनाच्या सेवेत करण्यात यावी.