चर्चा कशाची? रोहित शर्माच्या फुल्या-फुल्यावाल्या उत्तराची

क्रिकेटपटू धवल कुलकर्णी याने इन्स्टाग्राववर त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने प्रश्न विचारला आहे की,’ही चर्चा कशाबद्दल आहे ओळखू शकता?’ यावर हिंदुस्थानी संघाचा कर्णधार रोहीत शर्मा याने प्रतिक्रिया दिली आहे. मराठी शिव्या ज्यांना नीट माहिती आहेत, त्यांना या ‘फुल्या फुल्या’ असलेल्या शब्दाचा अर्थ व्यवस्थित ओळखला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhawal Kulkarni (@dhawal_kulkarni)

रोहीत शर्मा याने धवल कुलकर्णीला गंमतीत हे उत्तर दिलं आहे. त्याच्या या उत्तरानंतर मीम्सही तयार झाले असून तेही व्हायरल झाले आहेत. धवल कुलकर्णीच्या या पोस्टवर रोहीतने प्रतिक्रिया दिल्याने त्याची मूळ पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टपेक्षा त्याच्यावर रोहीत शर्माने खरोखर अशी प्रतिक्रिया दिली आहे का हे पाहण्यासाठी नेटीझन्स गर्दी करताना दिसतायत.

रोहीत शर्मा आणि धवल कुलकर्णी हे मुंबई संघाकडून एकत्र खेळलेले आहेत. धवल कुलकर्णीला हिंदुस्थानी संघातही स्थान मिळाले होते, मात्र तो फारशी चमकदार कामगिरी करू शकला नव्हता. IPL मध्ये धवल कुलकर्णी हा रोहीतच्याच मुंबई इंडीयन्स संघातून खेळलेला आहे. यामुळे धवल आणि रोहीत यांची चांगली मैत्री आहे असं मानायला हरकत नाही.

धवल कुलकर्णी त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत असतानाचा एक फोटो शेअर केला होता. यावर त्याने प्रश्न विचारला होता की ‘ही चर्चा कशाबद्दल आहे ओळखू शकता?’ यावर रोहित शर्माने म्हटलंय की “सबसे बड़ा zav**** कौन है?” मराठी शिव्या ज्यांना माहिती आहेत, त्यांना रोहितला नेमकं काय म्हणायचं होतं ते नीट कळालं. ज्यांना कळालं नव्हतं, त्यांना मराठी नेटीझन्सनी त्याचा अर्थ समजावून सांगितला, ज्यामुळे धवल कुलकर्णीची ही पोस्ट व्हायरल होत गेली.