
सामना ऑनलाईन । मुंबई
23 मार्चपासून आयपीएलच्या पर्वाला सुरुवात होतेय. टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये आयपीएल दाखल झालं आणि सगळी समीकरणंच बदलून गेली. पण, अर्थात आयपीएललाही फिक्सिंगचा डाग लागलाच. मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे एक तगडा संघ दोन वर्षं बाहेर राहिला. त्यावेळी नेमकं काय झालं होतं, हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. त्यात हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी एक वक्तव्य करताना दिसत आहे. मी एकवेळ खून करू शकतो, पण फिक्सिंग नाही, असं धोनी या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.
हा व्हिडीओ आहे एका ट्रेलरचा. आयपीएलचा एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय असलेला संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. विजेतेपदाचा जबरदस्त दावेदार असलेल्या या संघाला 2013मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोन वर्षांच्या निलंबनाला सामोरं जावं लागलं. त्या प्रकरणावर आधारित रॉर ऑफ द लायन नावाचा एक माहितीपट 20 मार्च रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. त्या माहितीपटाचा 45 मिनिटांचा एक ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. या ट्रेलरमध्ये धोन म्हणतोय की, संघ यात (फिक्सिंग) सामील होता. माझ्यावरही आरोप करण्यात येत होते. आम्हा सगळ्यांसाठीच हा काळ कठीण होता, असं धोनी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ-
Watch how @msdhoni and a bunch of men in yellow jerseys wrote one of India’s greatest comeback stories. #HotstarSpecials is proud to present #RoarOfTheLion. Trailer out. pic.twitter.com/nkWpV1EPnl
— Hotstar Specials (@HotstarSpecials) March 10, 2019
2018मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पुन्हा एकदा विजयाचा चषक उंचावला होता. यंदाही याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या बेतात सगळे खेळाडू दिसत आहेत.


























































