
सामना ऑनलाईन । नवीदिल्ली
एकेकाळी क्रिकेट विश्वातील सर्केत्कृष्ट फिनिशर म्हणून ख्याती असलेला महेंद्रसिंग धोनीच्या याच गुणांकर सध्या प्रश्नचिन्ह उभे राहिले असून त्याला जहरी टीकेचा सामना करावा लागत आहे. इंग्लंडविरुद्धच्या नन डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात धोनीने दहा हजारांचा पल्ला गाठला असला तरी दुसरीकडे टीम इंडियाच्या ८६ धावांनी झालेल्या पराभवाला त्याची संथ फलंदाजीला जबाबदार धरत त्यावर टीकेची झोड उठली आहे. इतकेच नव्हे तर त्याला मैदानात प्रेक्षकांच्या ‘हाय हाय’लादेखील सामोरे जावे लागले.
५८ चेंडूंत ३७ धावांची खेळी
इंग्लंडच्या ३२३ धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानचा डाव २३६ धावांमध्ये आटोपला. यादरम्यान ५८ चेंडूंत ३७ धावांची खेळी करणाऱ्या धोनीवर सर्वत्र टीका होऊ लागली. डेव्हिड किलीच्या षटकातील पहिले चार चेंडू धोनी निर्धाक खेळल्यानंतर प्रेक्षकांच्या संयमाचा बांध फुटला. त्यानंतर प्रत्येक निर्धाक चेंडूकर धोनीची हुर्ये उडकण्यास सुरकात झाली. या षटकाच्या अखेर शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल मैदानात पाणी घेऊन आल्यावर समालोचकांनीही धोनीला धावगती वाढवण्याचा संदेश आल्याचा अंदाज व्यक्त केला. पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनी बाद झाला.
कोहलीकडून पाठराखण
सामन्यानंतर झालेल्या समारंभात नासीर हुसेनने कर्णधार विराट कोहलीला धोनीच्या खेळीबाबत प्रश्न विचारला असता कोहलीने धोनीची पाठराखण केली. कोहली म्हणाला, त्याच्याकडे फलंदाजीसाठी फारसा वाव नव्हता. त्यामुळे खेळपट्टीवर टिकून राहणे महत्त्वाचे होते. धोनी बाद झाला असता तर आम्ही पूर्ण ५० षटके खेळू शकलो नसतो.



























































