Dhurandhar 2 – तुमच्या वडिलांचे निधन झालंय असं रडा! रहमान डकैतच्या अंत्ययात्रेचा सीन असा शूट झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धुरंधर 2 ची गेले कित्येक दिवस प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. आज हा चित्रपट सिनेमागृहात रीलीज झाल्यानंतर, प्रेक्षकांनी अक्षरशः या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. धुरंधर 2 चित्रपटातील प्रत्येक सीन हा इतक्या सक्षमतेने शूट केलेला दिसत आहे. धुरंधरमधील रहमान डकैतची अंत्ययात्रा हा सीन पाहताना प्रेक्षकांच्या अंगावरही काटा आला. धुरंधरला हिट बनवण्यात अक्षय खन्नाने महत्त्वाची भूमिका बजावली. रहमानच्या भूमिकेतील त्याचा प्रभावी अभिनय क्वचितच पाहायला मिळतो. खलनायक असूनही, तो चित्रपटात नायकासारखा चमकतो. धुरंधर-2 मधील त्याचा मृत्यूचा सीनही खूप भयानक होता.

रहमान डकैतच्या मृत्यूचा सीन शूट करताना आदित्य धरने खास काळजी घेतली होती. रहमान डकेतच्या अंतिम सीनसाठी रजत अरोडा याला एक विशेष सूचना देण्यात आली होती. आदित्य धर कडून एक विशेष सूचना मिळाली होती. रजत सांगतो, “आदित्य सरांनी आम्हाला अशी सूचना दिली होती की, रहमान डकैत हा तुमच्या वडिलांसारखा आहे, तुम्ही रहमान डकैतच्या गँगमध्ये आहात, तो एका अर्थाने तुमचे वडीलच होते. तर, जेव्हा तुमचे वडील वारतील तेव्हा तुम्हाला कसे वाटेल? तुम्हाला त्या भावना आणि संवेदना व्यक्त करायच्या आहेत. जणू काही तुमचे वडीलच वारले आहेत, अशाप्रकारे रडा. त्यांनी असेही सांगितले की फ्रेममधील प्रत्येकाने अशा भावना व्यक्त केल्या पाहिजेत, जणू काही त्यांची एखादी प्रिय व्यक्ती वारली आहे. अशा प्रकारे, प्रत्येकाचे त्या सीनकडे लक्ष जाईल आणि लोकांना तो कदाचित आवडेलही.”

‘धुरंधर’मध्ये शकीलची भूमिका साकारलेल्या विक्रम भांब्री यांनीही रहमान डाकूच्या मृत्यूच्या सीनबद्दल सांगितले. तो म्हणाला, “त्या दिवशी सकाळी आम्हाला स्क्रिप्ट मिळाली आणि ती वाचतानाच आमच्या मनात ही कल्पना आली होती की, आम्ही रहमान डाकूच्या अखेरच्या निरोपाचे दृश्य चित्रित करत आहोत. स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्या भूमिकेत शिरणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. मला माहित होते की, आम्ही रडू किंवा ओरडू शकत नाही, आम्हाला फक्त एक भावना व्यक्त करायची होती. आम्हाला कशाचाही अतिरेक करायचा नव्हता, फक्त त्या भूमिकेत राहायचे होते. आम्ही त्या दृश्यासाठी ग्लिसरीनचा अजिबात वापर केला नाही.”