हिऱ्याची आयात थांबली; कारागीर बेरोजगार

युक्रेन युद्धामुळे रशियाकर लागलेल्या निर्बंधांमुळे देशातील हिरे उद्योग अडचणीत सापडला आहे. रशियन हिऱयांची आयात थांबल्याने देशात कच्च्या हिऱयांची आयात 29 टक्क्यांनी घटली आहे. परिणामी गुजरातचे 25 हजार हिरे कारागीर बेरोजगार झाले आहेत. काम कमी झाल्याने साप्ताहिक सुटय़ा दोन आणि कामांचे तास 8 करून 6 केले आहेत. देशात रशियातून कार्षिक 75 हजार कोटी रुपयांचे कच्चे हिरे आयात केले जात होते. यातील बहुतांश साठा पातळ हिऱयांचा होता. अशा प्रकारचा हिरा जगातील इतर कोणत्याही देशात सापडत नाही.