डायमंड लीगमध्ये नीरजची रुपेरी कामगिरी, 90 मीटर भालाफेकीचे सुवर्ण प्रयत्न अपुरे पडले

विश्वचषक विजेता नीरज चोप्रा गुरुवारी रात्री झालेल्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीमध्ये दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. या कामगिरीमुळे गतविजेत्या नीरजला आपले जेतेपद राखण्यात अपयश आले. त्याने आपल्या सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात 85.01 मीटरचा सर्वोत्तम भालाफेक करून केशर्न वाल्कॉटला मागे टाकले आणि डायमंड लीगमध्ये रुपेरी यश मिळवले.

चोप्राने दोन वैध प्रयत्न आणि तीन फाऊलसह 84.35 मीटरचा भालाफेक नोंदवली, ज्यामुळे तो सुरुवातीला तिसऱया स्थानावर होता. या उपविजेतेपदामुळे हिंदुस्थानी दिग्गजाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग 26 स्पर्धांमध्ये टॉप-2 मध्ये राहण्याचा आपला अभूतपूर्व पराक्रम कायम ठेवला.

ऑक्टोबरमध्ये टोकियो येथे होणाऱया विश्वचषक स्पर्धेच्या काही आठवडय़ांपूर्वी आयोजित या स्पर्धेत चोप्रा आपल्या गतवर्षी जिंकलेल्या जेतेपदाला कायम ठेवण्यात अपयशी ठरला. त्याच्या 84.35 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नामुळे त्याला स्वित्झर्लंडच्या झुरिखमध्ये झालेल्या स्पर्धेत 7 खेळाडूंमध्ये तिसऱया स्थानावर ठेवण्यात यशस्वी ठरले. त्याची ही कामगिरी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षा (90.23 मीटर) खूपच साधारण ठरली.

आज गतविजेत्या निरजला लय मिळवण्यात अनेक अडचणी आल्या, तंत्रात चुका झाल्यामुळे सर्वोत्तम प्रयत्न करणे कठीण झाले. अंतिम विजेता जर्मनीचा जुलियन वेबरने पहिल्या फेरीतच वैयक्तिक सर्वोत्तम आणि जागतिक दर्जाची 91.37 मीटर भालाफेक केली. ज्यामुळे स्पर्धेवर त्याने पहिल्याच प्रयत्नात आपली पकड मजबूत केली. त्याच्या भालाफेकीला कोणीही आव्हान देऊ शकला नाही.