
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलची किंमत वाढल्याने त्याचा परिणाम इंधनांच्या दरावर झाला आहे. डिझेलची किंमत 25 रुपयांनी वाढली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
या किंमती घाऊक विक्रेत्यांवर थेट परिणाम करत आहेत. घाऊक विक्रेत्यांसाठी 25 रुपये प्रतिलीटर इतकी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत डीझेलच्या घाऊक विक्रीचा दर 115 रुपये इतका झाला आहे. तर मुंबईत हाच दर 122.05 इतका आहे. तर दोन्हीकडे पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या डीझेलच्या किमती या अनुक्रमे 86.67 रुपये आणि 94.14 रुपये प्रतिलीटर आहेत.
घाऊक माध्यमातून डीझेल खरेदी करणाऱ्या कंपन्यांमध्ये संरक्षण, रेल्वे आणि वाहतूक विभाग, वीज प्रकल्प, सिमेंट उत्पादन आणि रासायनिक प्रकल्पांचा समावेश आहे.
हा दर घाऊक विक्रीसाठी असल्याने अर्थात किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांवर याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे पेट्रोल पंपावरच्या डीझेलच्या किमती वाढणार नाहीत.





























































