ब्लड ग्रुपनुसार करा डाएट आणि राहा फिट

3189

ठणठणीत राहण्यासाठी शरीराला योग्य आहाराची गरज असते. पण जर तुम्ही आवडतं म्हणुन उठसुठ काहीही आबरट चाबरट खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा थेट संबंध तुमच्या ब्लड ग्रुपशी असतो. यामुळे जर तुम्ही ब्लडग्रुपनुसार डाएट ठेवलंत तर फिट राहाल. असं तज्ज्ञांनी सांगितले आहे. ए, बी, एबी, आणि ओ. हे आपले चार प्रकारचे ब्लडग्रुप आहेत. प्रत्येक ब्लडग्रुपचे आपले असे एक वैशिष्टय आहे म्हणूनच ते वेगळे आहेत.

diet-protein

यातील ब्लडग्रुप असलेल्या व्यक्तींच्या आहारात प्रोटीनयुक्त आहारांचा समावेश असणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने डाळी, मांस, मच्छी, फळ यांचा आहारात आवर्जून समावेश करावा. मात्र कडधान्य आणि फळांचे सेवन प्रमाणात करावे.

green-veg

ब्लडग्रुप असणाऱ्या व्यक्तींनाही आहारात काळजी घेणे गरजेचे असते. हा ब्लडग्रुप असणाऱ्या व्यक्तींनी हिरव्या भाज्या, टोफू, मासे, डाळी यांचा आहारात समावेश करावा. तसेच जर हा ब्लडग्रुप असणाऱ्या व्यक्ती वजन कमी करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी ऑलिव्ह आईल, दूधापासून तयार करण्यात आलेले उत्पन्न, मका, मासे यांचादेखील आहारात विशेष सहभाग करावा. तसेच हा ब्लडग्रुप असणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. यामुळे या व्यक्तींनी मांस खाणे टाळावे.

diet-1

बी ब्लडग्रुपवाले मात्र याबाबतीत भाग्यशाली असतात. कारण त्यांना जास्त पथ्य पाळावे लागत नाहीत. हा ब्लडग्रुप असणाऱ्या व्यक्ती फळभाज्या, फळ, मांस, मासे, सर्व काही खाऊ शकतात. या व्यक्तींची पचनक्रिया संतुलित असते. यामुळे इतर व्यक्तींच्या तुलनेत यांच्या शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण कमी असते.

diet-final

एबी ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींनी संतुलित आहार करणे गरजेचे आहे. या व्यक्तींनी फळभाज्या आणि फळांचा आहारात समावेश करावा. अंडी खाणे यांच्यासाठी फायदेशीर. पण मांस खाण् टाळावे. दुग्धजन्य पदार्थ यांच्यासाठी फायदेशीर.

आपली प्रतिक्रिया द्या