
रिलायन्स जनरल इन्श्युरन्सने रिलायन्स – डिजिटल केअर मॅनेजमेंट हे प्रोडक्ट सादर केले. बाह्यरुग्ण उपचारांसाठी येणाऱ्या नियमित वैद्यकीय खर्चासाठी पॉलिसीधारकाला संरक्षण उपलब्ध करून देणे हे या प्रॉडक्टचे उद्दिष्ट आहे. इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या चौकटीतील मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत नवा पायंडा पाडणारी ऑफरिंग म्हणून या प्रॉडक्टची निवड करण्यात आली आहे.

























































