लघुउद्योजकांसाठी डिजिटल, आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डिजिटल पेमेंटमधील अग्रणी पंपनी व्हिसा आणि नॅसकॉम फाऊंडेशनने महिला उद्योजकांना डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेसाठी प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा केली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व पश्चिम बंगाल या पाच राज्यांत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे देशातील एमएसएमई क्षेत्राला मोठा फटका बसला असून महिला उद्योजकांना  प्रतिकूल परिणामाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे 650 हून अधिक महिला लघुउद्योजकांना ऑनलाइन जाण्यास, पुन्हा नव्याने सुरुवात करण्यास आणि आपला व्यवसाय विस्तारण्याबाबत प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच व्हिसा वंचित विभागांसाठी डिजिटल व आर्थिक समावेशाला चालना देण्यासाठी काम करणार असल्याचे व्हिसाचे ग्रुप पंट्री मॅनेजर टी. आर. रामचंद्रन यांनी सांगितले.