मद्यनिर्मिती ते मद्यविक्री प्रक्रियेचे होणार संगणकीकरण, करचोरीला आळा घालण्यासाठी नवी शक्कल

469

वाइन शॉपमधून मोठय़ा प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याने सरकारचा कोटय़वधी रूपयांचा महसूल बुडला जातो. अशा करचोरीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी शक्कल शोधून काढली आहे. त्यानुसार मद्यनिर्माता ते वाईन शॉपमधील मद्यविक्रीपर्यंतची सर्व प्रक्रिया संगणकाच्या माध्यमातून जोडण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच अवैध मद्यविक्री, हातभट्टी निर्मितीमुळे राज्याच्या महसुलात होणारी तूट टाळण्यासाठी पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त छापे टाकावेत, असे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

राज्याच्या महसूल वाढीबाबत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या