
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री खासदार दिग्विजय सिंह यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
दिग्विजय सिंह यांचे दुपारी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर ते मातोश्री निवासस्थानी पोहचले. त्यांचे उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांकडे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ही केवळ सदिच्छा भेट होती, असे सांगण्यात आले.

























































