प्लॅस्टिक वापरावर कडक निर्बंध 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे

आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात  प्लॅस्टिक अविभाज्य अंग झाले आहे. अगदीच अनिर्बंधपणे आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि

प्लॅस्टिकच्या इतरही वस्तूंचा सहज वापर करत असतो.

भाजीपाला, फळफळावळे, किराणा माल वस्तू, दूध, डेअरी आयटम, कपडा, हॉटेल्सवर, पावभाजी ठेल्यावर, कुल्फी-आयपीम गाडय़ांवर, पुस्तकांच्या दुकानात,  फूट वेअरमध्ये, प्रवासात,

प्लॅस्टिक पिशव्यांचा वापरही अगदी सहजपणे होत असतो. मग त्या पिशव्यांची जाडी 50।75 मापॉन आहे का? का त्यापेक्षाही कमी आहे हे पाहायला कोणाला वेळ आहे. आजच्या गतिमान जीवनात त्या त्या  वेळेची गरज भागतेय ना. बस्स. बाकी गोष्टींना वेळ नाही.

घरगुती वस्तू वापरायच्या बाबतीत तेच. फ्रीजमधल्या पाण्याच्या बॉटल्स, भाजीपाला ठेवायला पिशव्या, प्लॅस्टिक कप, मग, यूज अॅण्ड थ्रोजचे ग्लास, घरगुती चटण्या, मिरच्या, तिखट, मीठ, मसाला अशा अनेक वस्तू ठेवण्यासाठी प्लॅस्टिक बरण्यांचा वापर होत असतो. या वस्तूंचे उपयोग अनेकविध असले तरी दुष्परिणामही तितकेच आहेत. फ्रीजमधल्या पाण्याच्या बॉटल्स किती दिवस वापराव्यात, वेगवेगळय़ा ठिकाणी प्रवासात घेतलेल्या पाण्याचा बॉटल्स केव्हापर्यंत वापराव्या, त्याचा परत वापर करावा का? याचा आपण काही विचारच करत नाही. आणि त्याचे ज्ञानही अनेकांना नसते. त्यामुळे एका विशिष्ट काळानंतर त्याचे दुष्परिणाम नकळत आपल्या शरीरावर होत असतात.

घरामधला कचरा प्लॅस्टिक पिशव्यांतून कचरा गाडय़ांत दिला जातो. उरलेले शिळे अन्नही पिशव्यांतूनच गृहिणी टाकत असतात.अर्थातच त्यांनाही काही पर्याय नसतो. त्यांचा नाइलाज असतो.अनेक निरुपयोगी

बॉटल्स, प्लॅस्टिक वस्तू, चहाचे युज अॅण्ड थ्रो ग्लास, लग्न समारंभानंतरच्या डिश कचरा गाडय़ांत दिल्या जातात.नगरपालिकांचे कचरा व्यवस्थापन योग्यरीत्या होत असेल तर तो कचरा कचरा डेपोवर टाकला जातो, अन्यथा गाव, शहराच्या बाहेरच रस्त्यांच्या कडेला दुतर्फा टाकला जातो. त्याच कचऱ्यातील

प्लॅस्टिक पिशव्या हवेमुळे इकडे तिकडे पसरतात. शिळय़ा अन्नाच्या पिशव्या खाण्यासाठी गाई-म्हशी आदी गुरेढोरे तिथे जमतात. अन्नाबरोबरच ते पिशव्याही खातात. अशा पिशव्या खाण्यामुळे हजारो जनावरे मृत पावतात. पशुधन नष्ट होते. देवस्थाने, पर्यटनस्थळेही अशा कचऱ्याची मोठी ठिकाणे आहेत. या ठिकाणी पर्यटक प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या नाल्यातच फेकून देतात. पर्यायाने नाले, गटारी तुंबतात. दुर्गधी फैलावते. रोगराईला आमंत्रण असते.

अनेक मोठय़ा शहरात कचरा डेपो असतात, ते नावालाच. कारण तिथे कचऱ्यावर कचरा टाकला जातो. त्या कचऱ्यात 60 ते 70 टक्के प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, प्लॅस्टिक वस्तूच असतात. हा कचरा कधीच नष्ट होत नसतो. त्याचे विघटन होत नसते. कारण प्लॅस्टिक पिशव्या नष्ट व्हायला खूप काळ जावा लागतो असे पर्यावरणतज्ञांचे ठाम मत आहे.

शासनाने 50 मापॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आणली, पण तरीही आज बाजारपेठेत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे.

देशभरातील सिंगल युज ऑफ प्लॅस्टिक वापस आळा बसण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घोषित केला आहे त्यानुसार 1 जुलै 2022 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली.  सिंगल युज प्लॅस्टिक वापर करणे, उत्पादन करणे, साठा करणे, पी करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

20 सप्टेंबरपासून प्लॅस्टिकच्या पिशव्यांची जाडी 50 मापोन होऊन वाढून 75 मापोनपर्यंत वाढवली आहे. त्यानंतर ही जाडी 120 पर्यंत असणार आहे.

केवळ शासनाचीच ही जबाबदारी नाही, पण नागरिक जर बेजबाबदारपणे, नियमबाह्य अशा पिशव्यांचा वापर करत असतील तर त्यांना कायद्याचा बडगा दोघांनाही अर्थातच पिशवी देणारा व घेणारा दोघांनाही हवा.

शासनाने प्लॅस्टिक कचरा विघटनाचे संदर्भात अद्ययावत यंत्रणा उभी करायला हवी, जेणेकरून हा कचरा वाढणार नाही. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. कचरा विघटनाचे कार्य काही ठिकाणी सुरू आहे, परंतु अधिक व्यापक प्रमाणावर ते व्हायला हवे तरच कचरा आटोक्यात येईल.

शेवटी एकच महत्त्वाचे, नियमबाह्य मापॉनपेक्षा कमी जाडी प्लॅस्टिक पिशवी उत्पादन बंद आणि इतर प्लॅस्टिक विघटन करून नष्ट करणे हाच प्रभाची तोडगा आहे. तरच हे शक्य आहे, नाही तर हा कचरा वाढतच जाणार आहे. नियम, कायदे हे तर केले जातात, पण त्याची अंमलबजावणी होते हा माझा प्रश्न आहे. नाही तर हे प्रश्न कायम राहणार आहेच.

या प्लॅस्टिकचं करायचं काय?

[email protected]