लेख – मातीचे गायन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

माती या विषयावर जगातील सर्व भाषांमध्ये शेकडो वर्षे भरपूर लिहिले गेले आहे. कथा, कविता, विज्ञान या माध्यमातून मातीचं वर्णन केलं जातं. मातीवरून किती तरी वाप्रचार आढळतील. इतपं आपलं मातीशी जिव्हाळय़ाचं नातं असतं. कारण ही मातीच आपल्याला धनधान्य देते. क्षणोक्षणी जगवते. शेतकरी बांधव तर तिला आदराने ‘काळी आई’ म्हणतात आणि ते खरंच आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी म्हटलं, ‘काया मातीत मातीत, घाम जिरव जिरव, तवा पिकल पिकल, कायामधुनि हिरवं…’ माणसाची संस्कृती निर्माण झाली, रुजली आणि फुलली ती जगात सगळीकडेच मातीच्या आधाराने.

या महिन्याच्या सुरुवातीला या मातीचं स्मरण करणारा एक दिवस 5 डिसेंबरला असतो. असं म्हटलं जातं की, थोडं सुपीक मातीचा वावर आणि पुरेसा पाऊस, सूर्यप्रकाश असणं ही ‘श्रीमंती’ आहे. बरं हे सारं निसर्गाने न मागता दिलेलं दान आहे. त्याचा सांभाळ आपण म्हणजे जगातील सर्वजण कसा करतो ते महत्त्वाचं. काळय़ा मातीतून सोनं पिकवायचं तर मातीची काळजी घ्यावी लागते. निगरानी करावी लागते. शेतकरी ते करतच असतो, पण गेल्या दीड-दोनशे वर्षांत प्रदूषणाने ठिकठिकाणच्या मातीचा गंध हरवत चालला आहे. पहिल्या पावसाच्या सरीने तप्त मातीतून येणारा सुवास हा जीवन सुगंध असतो. त्याची जाणीव ठेवून माणसाने वागावे. म्हणून 2013 पासून संयुक्त राष्ट्रांनी ‘वर्ल्ड सॉइल डे’ पिंवा मृद दिन अथवा मातीचा दिवस साजरा करायचं ठरवलं. त्यासाठी 5 डिसेंबर हा दिवस मुक्रर करण्यात आला.

पृथ्वीवर शेतीप्रधान स्थिर संस्कृती रुजल्यावर वेगवेगळी पिके घ्यायला सुरुवात झाली. त्यालाही हजारो वर्षे लोटली. कोणे एकेकाळी संपूर्ण पृथ्वीवर माणसाच्या प्रजातीची खाणारी काही हजार पिंवा लाखात होती. तेव्हापासून माती माणसाची (आणि इतर सर्व सजीवांचीही) भूक भागवत आहे. मुळात सबंध जगात महासागर, दऱ्या-डोंगर वगैरे वगळता एकूण शेतजमीन तशी मर्यादितच आहे. त्यातच पिकाऊ मातीची देणगी काही देशांना प्रचंड प्रमाणावर लाभली असून काही जणांच्या वाटय़ाला निकस, रेताड जमीन आली आहे. अमेरिका सुपीक मातीच्या दृष्टीने समृद्ध आहे. त्यातही तिथली वस्ती आणि आधुनिक संस्कृती, तर अवघी दोन-अडीचशे वर्षांपूर्वीच हिंदुस्थान, चीन, जपान, युरोपातील काही देश, आफ्रिका आणि आखातातील देश तसं दक्षिण अमेरिका खंडात प्राचीन काळी विविध संस्कृती उदयाला आल्या. तिथे वस्ती वाढली. खाणारी तोंडे वाढली आणि मातीतून सोनं पिकवण्याची कला माणसाने अवगत केली. आजच्या रशियाच्या विस्तीर्ण प्रदेशातही सुपीक मातीचे मोठे क्षेत्र आहे. आमच्या शालेय भूगोलाच्या पुस्तकात युव्रेनमधल्या प्रचंड शेतांची आणि आधुनिक शेतकी अवजारांची माहिती होती.

मातीचं वैज्ञानिक पृथक्करण केलं तर ते भूपृष्ठावर सर्वत्र सारखं नाही. भूरचना, ऋतुमान आणि नैसर्गिक परिणामांमधून ठिकठिकाणची माती तयार झाली. मग तिथल्या संस्कृतीने त्या ऋतुमानाशी जुळवून घेत आपापली संस्कृती घडवली. भूगर्भात लाखो वर्षांपूर्वी झालेल्या हालचाली, बदल, वनस्पती, अतिसूक्ष्म जीव यातून पृष्ठभागावरचा मातीचा थर बनला. नद्यांनी रोरावत्या प्रवाहाबरोबर आणलेल्या गाळामुळे किनारे काही ठिकाणी विलक्षण सुपीक झाले, तर काही वेळा महापुरांनी जमिनीची प्रचंड धूप करून खडकांवरचा सुपीक मातीचा काही फुटांचा थर अक्षरशः खरवडून नेला. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातही काही ठिकाणी असा विपरीत अनुभव आला. शेतच्या शेत वाहून गेलं तर शेतकऱ्याने करायचे काय?

मातीत मुख्यत्वे काळय़ा रंगाची सच्छिद्रता, तपकिरी, लालसर मुरुमासारखे घटक असतात. महाराष्ट्रात दख्खनच्या पठारावर ‘ब्लॅक कॉटन’ किंवा काळीगार, पाणी धरून ठेवणारी सुपीक माती दिसते. कोकणपट्टीत काळसर आणि मुरुमाचं प्रमाण जास्त आढळतं. दक्षिणी बेसॉल्ट भागात गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्ये, डाळी, ऊस, फळं अशी पिपं मुख्यत्वे येतात, तर कोकणात कठीण कवचाचे नारळ, सुपारी आणि कोकम, काजू दिसतात. याच भागात राज्यातला सर्वाधिक पाऊस होत असल्याने तांदळाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर होतं. हे लक्षात घेतलं तर मर्यादित पिकाऊ माती प्लॅस्टिक पिंवा अन्य गोष्टींनी प्रदूषित होऊ नये याची जाणीव (अवेअरनेस) धान्य पिकवणाऱ्या आणि सेवन करणाऱ्या सर्वांनाच असणं गरजेचं आहे. ‘काळय़ा आई’शी कृतज्ञ राहायचं तर तातडीने किमान प्लॅस्टिकचा वापर आवरता घ्यायला हवा. त्याचा त्रास पाळीव प्राण्यांनाही होतोच. मातीचे गायन बेसूर होऊ नये ही जबाबदारी आपलीच आहे.