माजी आमदार दिलीप माने यांच्या गाडीला अपघात

979

सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांच्या गाडीला अपघात झाला आहे. इनोव्हा गाडी आणि मोटर सायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघात मोटर सायकलवरील तरुण जागीच ठार झाला आहे.

माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ हा अपघात झाला. अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव शहाजी राऊत असल्याचे समजते. माजी आमदार दिलीप माने सहकुटुंब म्हसवडच्या सिद्धनाथ दर्शनासाठी जाताना इनोव्हा आणि मोटर सायकल यांच्यात धडक झाली. या अपघात माने तसेच त्यांचे कुटुंबीय सुखरूप आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या