कान्हुर मेसाई – मांदळवाडी – लोणी रस्त्यासाठी निधी उप्लब्ध करून द्या; दिलीप वळसे पाटील यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूरच्या पश्चिमेकडील पठारी भागात असणाऱ्या कान्हूर मेसाई, मांदळवाडी ते लोणी हा ग्रामीण मार्ग क्रमांक 124 अत्यंत दूरवस्थेत असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी म्हणून सरपंच अनिल गोरडे यांनी कामगार,उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यांच्या या निवेदनाची दाखल घेत वळसे पाटील यांनी पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पुणे यांना जिल्हा नियोजन समितीमार्फत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिला असल्याचे सरपंच गोरडे यांनी सांगितले.

कान्हूर मेसाई परिसरातील नागरिकांना मंचर, नारायणगावकडे जाण्यासाठी हा एकमेव जवळचा मार्ग असून गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून दुचाकी व इतर वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वळसे पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या रस्त्याच्या दुरुस्तीकामासाठी निधी देण्याचे आदेश दिल्याने लवकरच या रस्त्याची दुरुस्ती होणार आहे.