
संस्था क्रिकेटवर वर्कलोडचे जास्त लोड वाढल्याचे चित्र दिसतेय. जर खेळाडू दुखापतग्रस्त असेल, अनफिट असेल तरच त्याला विश्रांती दिली गेली पाहिजे. मात्र जर खेळाडू पूर्णपणे फिट असेल तर त्याने सर्व सामने खेळायलाच हवेत, अशा शब्दांत हिंदुस्थानचे माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांनी सध्या चर्चेचा विषय असलेल्या ‘वर्कलोड’वर टीका केलीय. विशेषतः जसप्रीत बुमरासारख्या खेळाडूने स्वच्छेने सामना वगळता कामा नये. मी हे माझ्या कार्यकाळात जराही खपवून घेतले नसते, असेही ते म्हणाले.
वाढत्या ‘वर्कलोड’मुळे सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीनच कसोटी सामने खेळण्याचा निर्णय हिंदुस्थानचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराने घेतला आहे. त्यामुळे या वर्कलोड मॅनेंजमेंट धोरणावर क्रिकेटच्या सर्व स्तरातून मत व्यक्त केलं जात आहे.
एका क्रिकेट वृत्तवाहिनीशी बोलताना वेंगसरकर म्हणाले, बुमरा हा नक्कीच एक उत्पृष्ट गोलंदाज आहे, मात्र त्याच्यासारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाकडून सामन्यांच्या बाबतीत निवड करणारी कृती निराशाजनक आहे. दुसऱ्या कसोटीपूर्वी सात ते आठ दिवसांची विश्रांती मिळाल्यानंतरही बुमराने विश्रांती घेतली. आता महत्त्वाच्या चौथ्या कसोटीतदेखील बुमराच्या खेळण्याबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे, मात्र कोणती कसोटी खेळायची?, कोणती नाही खेळायची? याची निवड गोलंदाजाला करायला देणे हे मला पटत नाही. जर खेळाडू तंदुरुस्त असेल आणि तो उपलब्ध असेल तर त्याने देशासाठी सर्व सामने खेळलेच पाहिजेत. बुमरा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. तो हिंदुस्थानला सामना जिंपून देऊ शकतो. तुम्ही एखाद्या दौऱ्यावर असताना तुम्ही सर्व सामने खेळायला हवेत. कोणता सामना खेळायचा हे स्वच्छेने निवडण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दांत वेंगसरकर यांनी नाराजी व्यक्त केली.
माझ्या कार्यकाळामध्ये मी असे प्रकार
खपवून घेतले नसते. लीड्सनंतर भरपूर विश्रांती मिळालेली असतानादेखील बुमरा दुसऱ्या कसोटीत खेळला नाही, मात्र देशासाठी खेळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे योग्य नाही, असेही वेंगसरकर म्हणाले.