श्रम विज्ञान संस्थेला स्वायत्तता देण्याचा विचार, दिलीप वळसे-पाटील यांचे संकेत

परळ येथील पै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेला स्वायत्तता देण्याच्या प्रस्तावावर लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. या संस्थेच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

हिंदुस्थान हा तरुणांचा देश असल्याने येथील तरुणांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना आवश्यक सोयीसुविधा देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचेही वळसे-पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राज्यमंत्री बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, संस्थेचे संचालक विश्राम देशपांडे, केतकी देठे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बच्चू कडू यांनी श्रम विज्ञान संस्थेची शाखा मुंबई आणि नागपूरशिवाय इतर ठिकाणी सुरू करावी, जेणेकरून शेतकरी आणि कामगारांच्या मुलांना त्याचा लाभ घेता येईल, असे सांगितले.

तीन ते नऊ महिन्यांचे अभ्यासक्रम

संस्थेमार्फत नजीकच्या काळात तीन ते नऊ महिन्यांचे ऑनलाइन, ऑफलाइन अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे संस्थेचे संचालक विश्राम देशपांडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या