हिंसाचाराच्या माध्यमातून अभिव्यक्त होणे अयोग्य – नागराज मंजुळे

640

आपल्या देशात लोकशाही आहे. घटनेने प्रत्येकाला बोलण्याचा, अभिव्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे. एखादा बोलला म्हणून त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया दिलीच पहिजे असे नाही. त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. हिंसाचाराच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याचा मार्ग अयोग्य आहे, असे मत ‘शोध मराठी मनाचा 2020’ संमेलनाचे अध्यक्ष सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.

जागतिक मराठी अकादमी, पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकासमंडळ व सेंटर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पीएनपी नाट्यगृहामध्ये शोध मराठी मनाचा 2020 हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या शेवटच्या सत्रात नगराज मंजूळे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यंनी आपले विचार व्यक्त केले.

प्रत्येकाला बोलू दिले पाहिजे. संवाद साधला पाहिजे. बाजू सामजून घेतली पाहिजे. दडपून टाकणे योग्य नाही. दडपण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा कधीतरी विस्फोट होतो. भावनांचा उद्रेक होऊन त्या मार्ग बदलतात, असे मंजूळे म्हणाले. आपल्या देशात जाती व्यवस्था अजूनही टिकून आहे. थोडाथोडा बदल होतोय पण या बदलाचा वेग मंद आहे. ग्रामिण भागत अजूनही जातीयता आहे. जातीवरून आजही हिणवल जात, आशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पूर्वीच्या चित्रपटांमध्ये असणारे हीरो दिसायला सुंदर होते. जो दिसायला कुरूप तो खलनायक अशी विभागणी होती. चित्रपटातल जग स्वप्नाळू होतं. मला हे बदलायचं होतं. म्हणून मी वेगळे विषय निवडून चित्रपट केले. वास्तव मांडण्याचा प्रयत्न मी केला, असे मंजूळे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या