शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्तभंग कारवाईचा आदेश व्हॉट्सअ‍ॅपवर

शासकीय कर्मचाऱ्यावर यापुढे शिस्तभंग कारवाईच्या सूचना थेट व्हॉट्सअ‍ॅप किंवा ई-मेलद्वारे पाठवल्या जाणार आहेत. त्यामुळे पोस्टाने पाठवण्यात होणारा विलंब टाळता येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करायची असेल तर त्याला आधी नोटीस दिली जाते. जेणेकरून संबंधित कर्मचाऱ्यालाही त्याची बाजू मांडण्यासाठी वेळ मिळाली पाहिजे. बहुतेकदा व्यक्तिशः किंवा पोस्टाद्वारे ती कागदपत्रे पाठवली जात होती.