इस्रायलमध्ये सापडले प्राचीन प्रवेशद्वार….ज्यू लोकांच्या स्वतंत्र भूमीत प्राचीन शहराचे अवशेष…संशोधनाची नवी दिशा…

इस्रायल… स्वतःभोवती नेहमीच एक गुढतेचे वलय घेऊन राहणारा देश. दगड मातीचे प्राचीन बांधकाम.. स्थानिकांचे पारंपारिक पण आकर्षक राहणीमान.. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या देशाचे हिंदुस्थांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते. आजही कितीतरी इस्रायली कुटुंब स्वत:ला हिंदुस्थानी म्हणवून घेण्यात भूषण समजतात. मूळ जरी इस्रायली असले तरी आपल्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप होतात. बहुधा हेच मातीचे नाते त्यांचे त्यांच्या देशाशीही आहे. येथील बहुतांश बांधकामे माती आणि दगडापासून बांधलेली आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतेच इस्रायलमध्ये अतिप्राचीन प्रवेशद्वार सापडले आहे.

5,500 वर्षे जुना दगड आणि माती-विटांचे बांधकाम. पुरातत्व विभागाच्या संचालिका एमिली बिशॉफ यांनी या प्रवेश्द्वाराविषयी माहिती देताना सांगितले की ते अंशतः मातीच्या विटांनी व अंशतः अखंड दगडांनी बांधले आहे आणि हे दगड माझ्यापेक्षा मोठे आहेत,” तेल एरानी हे प्राचीन शहर इस्रायलमधील शहरीकरणाचे पहिले उदाहरण आहे. या शहरात सार्वजनिक इमारती, रस्ते , तटबंदी, ड्रेनेज सिस्टम असे नागरीकरणाचे पुरावे सापडले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांनाइतर अनेक मनोरंजक गोष्टीही या प्रवेशद्वारासोबत सापडल्या आहेत. यामध्ये मातीची भांडी, खेळणी यांचा समावेश आहे. या सर्व शोधांवर नव्याने संशोधन सुरु आहे.