मराठवाड्याला ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा, इस्त्रायलच्या प्रतिनिधींसोबत जयंत पाटील यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

458

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवण्याबाबत मेकोरेट कन्सल्टंट, काऊंसिल जनरल ऑफ इस्त्रायल यांच्या समवेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. इस्त्रायलमध्ये झालेल्या जलक्रांतीच्या धर्तीवर मराठवाड्यात त्यापद्धतची यंत्रणा राबवता येईल का याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मेकोरेट कन्सल्टंट, काऊंसिल जनरल ऑफ इस्त्रायल यांनी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली तसेच एक संयुक्त अभ्यास गट स्थापन करण्याबाबतही निर्णय झाला.
जलसंपदा विभागाचे सचिव घाणेकर, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक डॉ. एन. व्ही. शिंदे व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच इस्त्राईलचे प्रतिनिधी म्हणून याकोव, निलरोड कलमार, अनय जोगळेकर, डिगो बर्जर, जलसंपदा विभागाचे कपोले, बेलसरे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या